ओमी कलानी गटाला मोठा धक्का; जवळचे सहकारी बृज बिहारी शुक्ला भाजपमध्ये दाखल
उल्हासनगर |
आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ओमी कलानी यांच्या टीम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सचिव आणि ओमी कलानी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बृज बिहारी शुक्ला यांनी आपल्या समर्थकांसह राजीनामा देत थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
बृज बिहारी शुक्ला हे उल्हासनगरमधील उत्तर भारतीय समाजात प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, TOK पक्षाची ताकद कमी झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भाजपकडून शुक्ला यांचे पक्षात स्वागत करण्यात आले असून, आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्या अनुभवाचा व जनसंपर्काचा फायदा पक्षाला होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, या घडामोडीमुळे उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पक्षांतरामुळे उत्तर भारतीय मतदारांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आगामी काळात आणखी नेते पक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
What's Your Reaction?